भंडारा जिल्ह्यात साठी ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून द्यावा - प्रशासनाची मागणी

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 18/04/2021 7:34 PM




रोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भंडारा जिल्ह्यासाठी प्राणवायूचा पुरवठा वाढवून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला केली आहे यासाठीच्या पाठपुरावा पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम सुद्धा शासनाकडे करत असल्याचे त्यांनी सांगितले.  कोरोना च्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह निघत असून त्यांना प्राणवायू देणे आवश्यक झाले आहे.असे असताना पुढील काही दिवसात प्राणवायूची कमी जाणवू शकते ही बाब लक्षात घेता शासनाने भंडारा जिल्ह्यासाठी तातडीने प्राणवायू उपलब्ध करून द्यावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला केली आहे. कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने निघत आहेत त्यांच्या उपचारासाठी प्राणवायू गरजेचे आहे.ही बाब पालकमंत्री यांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिली आहे.ते सुद्धा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या