ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

छावणी परिषदेला रेमडीसीवर इंजेक्शनचा पुरवठा न केल्यास आंदोलनाचा इशारा: जीवन गायकवाड


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 4/18/2021 8:54:19 PM

भगूर : - छावनी परिषदेला तीन दिवसांपासून रेमडेसीवर इंजेक्शन्स चा पुरवठा जिल्हा प्रशासनाकडून होऊ शकलेला नाही.
१५ एप्रिल शुक्रवार पासून छावनी प्रशासनाने २७ रेमडेसिवीर ची मागणी करूनसुद्धा जिल्हाप्रशासनाकडून उपलब्ध करून देण्याबाबत अनास्था दाखविण्यात येत असून कोवीड रुग्नांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर ची शोधाशोध करून धावपळ करावी लागत आहे.देवळाली छावनी परिषदेच्या दवाखान्यात दाखल रुग्नापैकी २७ रुग्नांना रेमडेसिवीर ची गरज असल्याने सदर मागणी जिल्हाप्रशासनाकडे केली होती .सदर इंजेक्शन मिळण्याकामी तीन दिवसापासून मेल पाठवून छावनी परिषदेकडून दररोज मागणी नोंदवली जाते तसेच इंजेक्शन मिळावे याकरिता कर्मचारी सकाळीच नासिकला जातात पण सांयकाळी पर्यंत त्यांना थांबवून सांयकाळी इंजेक्शन संपल्याची माहिती देण्यात असल्याने जिल्हाप्रशासन खाजगी रुग्नांना मागणी तेवढे इंजेक्शन्स देतात छावनी परिषदेचा दवाखाना सरकारी असून पुरवठा होत नसल्याने देवाच्या भरवश्यावरच रुग्न सेवा करावी लागत आहे. याबाबत सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी सोमवार पर्यंत इंजेक्शन न मिळल्यास आंदोलन करण्याचा इशारा जीवन गायकवाड, अँड बाळासाहेब आडके,सचिन ठाकरे,बाबूराव मोजाड,,तानाजी करंजकर, तानाजी भोर,वैभव पाळदे,रोहित कासार,सुरेश निकम,सोमनाथ खताळे आदिंनी दिला आहे

Share

Other News