पेंढरी येथे कोरोनाचा उद्रेक !

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 18/04/2021 10:27 PM

RTPCR चाचणीत आढळले एकाच दिवशी नऊ करूना बाधित रुग्ण
 
पेंढरी :-
            धानोरा तालुक्यातील मौजा पेंढरी या गावामध्ये एकाच दिवशीच्या चाचणीत अख्ख्या नऊ कोरोणा बाधित रुग्ण आढळून आल्याने गावात तसेच परिसरात एकच खळबळ उडालेली आहे व सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे .
 दरम्यान ग्रामपंचायतीने खबरदारी घेत सर्व व्यापारी व गावातील लोकांची बैठक घेऊन यावर कशी उपाययोजना करता येईल जेणे करून गावात आणखी रुग्ण वाढू नयेत आणि परिस्थिती कसे नियंत्रणात आणता येईल यावर गावातील सरपंच पवन येरमे यांनी चर्चा करून नवीन नियमावली जाहीर केलेली आहे , त्यात जिल्हाधिकारी साहेबांनी तसेच तहसीलदार साहेब धानोरा यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे तसेच बाहेरून ये-जा करणाऱ्या सर्व लोकांवर बंदी घालणे , लग्न सोहळा फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत पार पाडणे, विना मास्क असणाऱ्या वर दंड ठोकणे , सर्व शासकीय कार्यालय पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवणे, जिवनावश्‍यक वस्तूंची दुकाने फक्त पाच तास कोविडंचे सर्व नियम पाळून सुरू ठेवणे ,  विनाकारण फिरणार्‍या लोकांवर दंड आकारणे,आठवडी बाजारपेठ पूर्णपने बंद ठेवले असे अनेक नियम बंधनकारक करण्यात आले आहे.
        विशेष म्हणजे पेंढरी हे गाव परिसरातील चाळीसगावा पेक्षा मोठे असून येथे उत्तम बाजारपेठ , बँक ,रुग्णालय, व सर्व सुविधायुक्त असलेले गाव आहे त्या निमित्ताने येथे नेहमीच लोकांची चांगली वर्दळ असते तरीपण मागील वर्षी पसरलेल्या कोरोनाच्या महामारीत येथील किंवा परिसरातील एकही कोरोना रुग्ण सापडलेला नव्हता परंतु या वेळेस बाहेरून येणाऱ्या लोकांची गर्दी जास्त असल्याने तसेच गावात व परिसरात मागील एक वर्षापासून रखडलेले बरेच लोकांचे लग्नसमारंभ यावर्षी धुमधडाक्यात झाल्याने कोरोना पसरण्यात मदत झालेली आहे आणि अशा अनेक कारणामुळे आज पेंढरी सारख्या गावात एकाच दिवशी नऊ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत .
       दरम्यान सर्व नवही रुग्णाची परिस्थिती विशेष गंभीर नसल्याने त्यांना सध्या आपापल्या घरीच होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलेले आहे. आणि सापडलेल्या रुग्णाच्या घरातील परिसराला कंटेनमेंट परिसर घोषित करून तेथील आवाजाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेली आहे .







संतोष मंडल (गडचिरोली जिल्हा सहसंपादक)
9421735928

Share

Other News

ताज्या बातम्या