यंदा देशात नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 1 जूनला आगमन

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 12/05/2021 10:21 PM

            राज्यात पुढील पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता यंदा देशात नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे आगमन 1 जून रोजी होणार आहे. तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain) 10 जूनच्या आसपास दाखल होईल. त्यापूर्वी आता राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. 12 मे ते 16 मे या पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख राज्य महाराष्ट्र, केरळ, गुजरातला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारने चक्रीवादळाला टाँकटाइ असं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता आहे.





देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)
7588888787

Share

Other News

ताज्या बातम्या