ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

विवेकानंद युवा मंडळाने केला अमित शिंदे यांचा सत्कार


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 5/13/2021 9:56:03 PM

- उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी लढा देणारे एक उमदे युवा नेतृत्व माननीय अमितभैय्या शिंदे यांनी मागील काही वर्षांत शहर विकासासाठी खूप मोठे प्रयत्न केले आहेत.विवेकानंद युवा मंडळासह त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला असून सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पटलावर अमितभैय्या कायम तत्पर असतात. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 'उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष' म्हणून निवड केली आहे.ही निवड राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्फत जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली. या निवडीबद्दल सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या विवेकानंद युवा मंडळाने त्यांचा विशेष सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, स्वप्निल देशमुख, प्रतिक मगर, महेंद्रप्रताप जाधव व आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News