ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

लॉकडाऊन मध्ये नियम न पाळणार्‍यावर भगूर मध्ये प्रशासनाची दंडात्मक कारवाई


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 5/14/2021 10:30:34 AM

लॉकडाऊन मध्ये नियम न पाळणार्‍यावर भगूर मध्ये प्रशासनाची दंडात्मक कारवाई

 महाराष्ट्रात हाहंकार माझविणाऱ्या covid-19 च्य विषाणूच्या प्रादुर्भावाने वाढत चाललेल्या  संसर्गाचा  आडगाव करण्यासाठी  माननीय पोलिस आयुक्त नाशिक शहर .तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक.  यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये 12 मे पासून ते 23 मे पर्यंत कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले .अत्यावश्यक सेवे शिवाय कोणालाही इतर अस्थापना सुरू न ठेवण्याचे आव्हान करून सुद्धा काही नागरिक नियम मोडतांना आढळून येत आहे अशा नियम भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्याची किंमत सुद्धा मोजावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. माननीय पोलीस उपायुक्त  परिमंडळ दोनचे विजय खरात साहेब मा.सहा.पोलीस आयुक्त  वि .4 समीर शेख साहेब मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प भगूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैरवनाथ मंदिर व भगूर नाका नंबर 2 या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची नाकाबंदी लावण्यात आली . याकामी  तीन बीट मार्शल नेमण्यात आले आहे.  व तीन मोठी वाहने अधिकाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत आहे .सदरची कारवाई करणे कामी एक पोलीस निरीक्षक. दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. एक पोलीस उपनिरीक्षक. व पस्तीस पोलीस अमलदार. असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच भगूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. भगूर नगरपालिकेचे अधिकारी रमेश राठोड. केयुर राय .बिजपुरे .सोनवणे. बोराडे. तिवडे. सागर गायकवाड. चंद्रकांत काळे. रमेश कांगणे. परसराम कुठे. मोहन गायकवाड .खंडू लकारे. कुणाल लखन. हे सर्व मिळून परिसरातील विविध भाग अक्षरशः पिंजून काढताना पहायला मिळाले. परिसरात नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली गेली. जे व्यवसायिक नियम धाब्यावर बसवून आपल्या आस्थापना सुरू ठेवताना आढळले व मास परिधान न केलेली व्यक्ती आढळणे. घराबाहेर पडण्याचं काही कारण दिसत नाही अशांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. शहरातील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या उपाययोजना ना नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने. स्वयंशिस्तीने. सहकार्य करावे. आणि विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे असे आव्हान भगूर नगरपालिकेच्या वतीने ध्वनि निरपेक्षा वरून नगरपालिकेचे कुणाल लखन यांनी केल्याचे पहायला मिळाले. तसेच आज पोलिसांची काठी बऱ्याच जणांना पाहायला मिळाली काहींनी तर त्याचा एवढा धसका घेतला की ज्यांनी ही प्रत्यक्ष फटकेबाजी पाहिली त्यांनी इतरांना याची खबर देताना भगूर देवळाली परिसरात देशमुख बाबा चा प्रसाद चौफेर वाटला जातोय. घरातच बसा असे संदेश दिल्याचे पाहायला मिळाले. कोरोना ला आपल्याला हरवायचे असेल तर त्याची साखळी तोडणे आवश्यक आहे.आणि या कामात समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन यामध्ये समन्वय ठेवून एकजुटीने काम करत प्रशासनाच्या आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या जीवाचे मोल राखून आपल्या कुटुंबाला या रोगाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेऊन या लढ्यात जबाबदारी ओळखून सहभागी व्हावे लागणार आहे. यातच सर्वांचे सौख्य सामावलेले आहे

Share

Other News