*कैद्यांच्या स्वागतासाठी मिरवणूक*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 01/08/2021 4:22 PM

   ⭕पाच जणांना अटक......
 
मुंबई : तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांच्या स्वागतासाठी दुचाकी रॅली काढल्याची घटना मालवणीत घडली. 
मात्र हा जल्लोष काही वेळाचाच ठरला. 
करोना नियमांचे उल्लंघन करून रॅली काढल्याने या आरोपींवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून त्यांना पुन्हा अटक केली. 
मालवणी पोलिसांनी रॅली काढणाऱ्या ५ जणांना अटक केली. 
कबीर मुल्ला, अजमल कुरेशी, अफजल कुरेशी, मनोज व्यास, सादीक शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत.
 हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांवर ६ जुलैला मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
पोलिसांनी त्यांना अटक केली होती. 
 हे सर्वजण तुरुंगातून सुटले. 
त्यांच्या जल्लोषासाठी त्यांनी ८ दुचाकींवरून रॅली काढली. 
त्यात २५ ते ३० जण सामील झाले होते.

Share

Other News

ताज्या बातम्या