ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*ऑनलाईन गेमिंगच्या वेडाने घेतला जीव*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/1/2021 4:34:55 PM

  ⭕सहावीतला विद्यार्थी ४० हजार हरला, 
⭕नंतर….......
 
करोना आणि लॉकडाऊनमुळे मुलं घरीच आहेत.
 शिक्षण ऑनलाइन सुरू असल्यानं पालकांनी मुलांना मोबाईल, लॅपटॉप घेऊन दिलेत. 
मुलं मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर अभ्यासा व्यतिरिक्त गेम खेळण्यासाठी करत असतात.
 अनेकदा मुलं ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन काहीतरी करून बसतात, 
तर अनेक मुलं जीव गमावून बसतात. 
अशीच एक घटना मध्य प्रदेश मधील छत्तरपूरमधून समोर आली आहे. 
इथं एका १३ वर्षीय मुलानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. 
ऑनलाइन गेममध्ये ४० हजार रुपये हरल्यानंतर आत्महत्या करत असल्याचं या मुलानं सुसाइड नोटमध्ये म्हटलंय.
 या घटनेबद्दल पोलीस उपअधीक्षक शशांक जैन यांनी माहिती दिली.
 ते म्हणाले की,
 “या अल्पवयीन मुलाने सुसाईड नोट लिहून छत्तरपूरमध्ये राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
 हा मुलगा सहाव्या वर्गात शिकत होता.
 या मुलाने आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणीच नव्हतं. त्याची आई नर्स असून ती रुग्णालयात कामावर गेली होती.
 तर वडील देखील कामानिमित्त घराबाहेर होते. 
मुलाच्या आईला तिच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज मिळाल्यानंतर तिने मुलाला फोन केला आणि रागावली. 
त्यानंतर मुलाने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. 
त्यानंतर थोड्या वेळाने त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला आवाज दिला. 
मात्र, तो खोलीचं दार उघडत नव्हता.
 मुलीने याबद्दल पालकांना सांगितलं.
 पालक घरी आल्यानंतर त्यांनी दार तोडून रुममध्ये प्रवेश केला तेव्हा मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
 मुलाने स्कार्फच्या मदतीने पंख्याला गळफास घेतला होता.

Share

Other News