ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*पोलिसांना मे.उच्च न्यायालयाची नोटीस*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/1/2021 4:59:56 PM

     ⭕तपासात वन्यप्राण्यासंदर्भात दिशानिर्देशाचे उल्लंघन.........

 नागपूर : चंद्रपूर जिल्ह्य़ांतर्गत सहा महिन्यात ५४ लोकांचा मृत्यू झाल्याचे गुन्हे पोलिसांनी दाखल केले. 
पण, असा तपास करताना वन्यजीवासंदर्भात काही दिशानिर्देश ठरवून दिले असून त्यानुसार पुरावे गोळा करण्यात आले नसल्याची बाब मे.उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. 
त्यावर मे.न्यायालयाने चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावून तीन आठवडय़ात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. 
गेल्या सहा महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५४ लोकांचा मृत्यू झाला. 
पण, पोलिसांनी तपास करताना कोणत्या प्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाला, 
हे शोधण्यासाठी आवश्यक पुरावे गोळा केले नाही. 
हल्ला करणारा वाघ, बिबटया की अस्वल यापैकी कोणता प्राणी होता, 
हे स्पष्ट नाही. 
पण, वन्यजीव आणि नागरिकांमधील संघर्षांत मृत्यू झाल्यास वाघाला दोषी धरण्यात येते. 
पोलीस यंत्रणेच्या चुकीमुळे हे घडत आहे.
 वन्यजीवांच्या हल्ल्यात लोकांचा मृत्यू झाल्यानंतर तपास करणे व पुरावे गोळा करण्यासाठी काही दिशानिर्देश ठरवून दिले आहेत. 
याचे उल्लंघन चंद्रपूर पोलिसांकडून झालेले आहे. 
एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करीत असेल किंवा हत्या करीत असेल तर त्याची ओळख पटवून त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते. 
यातून अशा घटना रोखण्यास मदत होते. 
पण, वन्यजीवांच्या हल्ल्यात नेमका कोणत्या प्राण्यांमुळे संबंधित व्यक्ती मरण पावला, हे शोधले जात नाही.
 याचाही तपास होण्याची आवश्यकता आहे, 
अशी मागणी याचिकाकर्त्यां रेड लिंक्स कन्फडरेशनच्या संचालिका संगीता डोगरा यांनी  केली आहे.

Share

Other News