ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

मिरजेतील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे ऑनलाईन उदघाटन , सुधार समितीने वाटले साखर व पेढे...!!!


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/26/2021 8:54:48 AM


## 24 कोटींचा 10.800 किमीचा होणार रस्ता
शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी साखर,पेढे वाटून केला आनंदोत्सव...


      मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या विकासाला अखेर मुहूर्त लागला. शनिवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कराडहून ऑनलाइन द्वारे या रस्त्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. मिरजेत स्टेशन चौकात चौकात मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, साखर, पेढे वाटप करत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या आभाराचे फलक लावून आनंदोत्सव साजरा केला. 

 छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा शहरातील मुख्य रस्ता आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे असल्याने रस्ता दुरुस्तीसह अन्य सुधारणा महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला करता येत नव्हते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक वाहनधारकांसह पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला होता. हा रस्ता रुंदीकरण करून सुसज्ज करावा यासाठी मिरज शहर सुधार समिती 2015 पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे पाठपुरावासह अनेक वेळा आंदोलन केले. या रस्त्यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सुध्दा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरल्याने ना. गडकरी यांनी विशेष बाब म्हणून 24 कोटींचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला. 
ऑगस्ट महिन्यात रस्त्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर शनिवारी ऑनलाईन द्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कराडमधून या रस्त्याचे उदघाटन केले. उदघाटन होताच  मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन चौकात फटाके वाजवून साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे आभाराचे फलक  लावून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी समितीचे संस्थापक ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, मुस्तफा बुजरूक, मौला कुरणे, संतोष माने, शकील पीरजादे, मनोहर कुरणे, असिफ निपणीकर, अफजल बुजरूक, सौ. गीतांजली पाटील, सौ. सुनीता कोकाटे, श्रीकांत महाजन, अनिल देशपांडे, जहीर मुजावर, अरकान बेग, राकेश तामगावे, अक्षय वाघमारे, जावेद शरीकमसलत, इब्राहिम बागवान, निहाल पीरजादे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News