जि.प.सदस्यांच्या गैरहजेरीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची बैठक रद्द

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 27/09/2021 8:47 AM

माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील प्राथमिक  आरोग्य केंद्रात आरोग्य समितीची बैठक नियोजीत केली होती. 
मात्र रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष असलेल्या जि.प.सदस्य वनिता चव्हाण या हजर न झाल्याने नियोजित बैठक रद्द करण्यातआली. टाकरवण प्रा.आ.केंद्रात विविध समस्या वाढल्या आहेत. मात्र कोरोनामुळे अनेक दिवसापासून बैठक होत नसल्याने या ठिकाणी असणाऱ्या समस्या सुटायला तयार नाहीत. यामुळे रुग्णांचे हाल होत असून यापूर्वीही अध्यक्षांनी बैठक तहकुब केली होती. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.माजलगाव तालुक्यातील टाकरवण प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका , पाणी व अपुरे कर्मचारी अशा अनेक समस्या वाढल्या आहेत. मात्र जि.प.सदस्य व रुग्णकल्याण समितीच्या अध्यक्षा वनिता चव्हाण यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.समितीच्या सदस्यांचे आरोग्यकेंद्रातील समस्येकडे तर जि.प.सदस्याचे गटातील समस्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक दिवसापासुन येथील
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचा कॅम्प सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे. रूग्णवाहिका देखील धूळखात पडुन आहे. मात्र लोकप्रतीनीधींचे समस्येकडे दुर्लक्षअसल्याचा प्रत्यय नागरीकांना येत असुन जनतेतुन  तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या