ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

जि.प. सभापती जयसिंग सोळंके यांची ग्रामसेवकांना तंबी


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 9/27/2021 7:05:54 PM

माजलगांव तालुक्यात दोन दिवसापूर्वी वीस गावांमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ सभापती जयसिंग सोळंके यांच्या हस्ते झाला होता .नंतर सभापती जयसिंग सोळंके यांनी पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांचीआढावा बैठक घेऊन कर्तव्यावर असताना हलगर्जीपणा केला तर घरी बसावं लागेल असी तंबी सभापती जयसिंग सोळंके यांनी ग्रामसेवक व पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिली.तालुक्यातील वीस गावात दोन दिवसा पूर्वी सभापती जयसिंग सोळंके यांनी २५ १५योजने अंतर्गत रस्ता सभामंडप सह इतर विविध विकास कामाचे भूमिपूजन केले होते या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी गाव दौऱ्यामध्ये स्थानिक नागरिकांनाअसलेल्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या या अडचणी सोडवण्यासाठी दोन दिवसांचा दौरा संपताच  पंचायत समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली होती यामध्ये
घरकुल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पांदण रस्ते या विषयावर चर्चा झाली या सर्व समस्या सोडवण्यासाठी ग्रामसेवकांनी व पंचायत समिती कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला तर तो मी सहन करणार नाही हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसावे लागेल अशी तंबी बांधकाम सभापती जयसिंग सोळंके यांनी केली यावेळी  गट विकास अधिकारी सिद्धेश्वर हजारे पंचायत समिती सभापती पती भागवतजी खुळे उपसभापती वशिम मनसबदार पंचायत समिती सदस्य शिवाजी डाके कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News