ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

अन्यथा मनपाविरोधात न्यायालयात जाऊ :- चंदनदादा चव्हाण


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/1/2021 8:44:55 AM

 
सांगली : दि ३०,
   विकास शुल्क व प्रशमन शुल्क गुंठ्याला तीन पट घेण्याचा शासन आदेश दि 18 /10/2021 रोजी आला आहे सांमुकू आयुक्त मा कापडणीस यांनी हा आदेश निघाला त्या कालावधीच्या पुढे जे गुंठेवारी नागरिक प्रस्ताव पालिकेत सादर करतील त्यांच्यासाठी  लागू आहे ज्या नागरिकानी शासन आदेश निघायच्या अगोदर प्रस्ताव पैसे भरून दाखल केले आहेत त्यांना पूर्वीच्या दरात प्रमाण पत्र व मंजूर नकाशा देणेत यावा अन्यथा आपल्या पालिके विरोधात न्यायालयात जावे लागेल असा इशारा गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांनी दिला आहे.

    महाराष्ट्र राज्यात ज्या दिवशी शासन आदेश निघाला आहे त्या दिवसापासून पुढे जे लोक गुंठेवारी नियमितीकरण प्रस्ताव दाखल करतील त्यांना तीन पट आकारणी योग्य आहे मात्र शासन आदेश निघण्यापूर्वी ज्या गुंठेवारी धारकांनी जुन्या दराने पैसे भरून त्यांना वर्षांहून अधिक काळ विलंब लावला गेला अशा अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत मा आयुक यांनी का कारवाई केली नाही ? का त्यांना पाठिशी घातले गेले ? शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत का नागरिकांच्या प्रस्तावांचा निपटारा केला नाही ? ही चूक नगर रचना अधिकारी यांची असताना गुंठेवारी प्रस्ताव शिबिरात निपटारा करत असताना त्यांना नव्या आदेशा प्रमाणे तीन पट आकारणी जमा करण्याची तरतूद पालिकेने कोणत्या अधिकारात केली ? हे चालणार नाही .पालिकेला स्वतः कोणत्या कलमात फेरबदल करण्याचे अधिकार आहेत हे एकदा मा आयुक्त यांनी जनतेला माहिती साठी जाहिर करावे.

श्री.झगडे हे सहा नगर संचालक यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याचे समजते आहे तरी मा आयुक्त यांनी पालिका ही कायद्या प्रमाणे कामकाज चालते मनमानी पणे कामकाज चालत नाही हे एकदा त्यांना याबाबत समज द्यावी.अन्यथा गुंठेवारी प्रस्ताव धारकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल .

शासन आदेश 18/10/2021 रोजी निघाला आहे यापुढे जे प्रस्ताव धारक प्रस्ताव जमा करतील त्यांना हा कायदा लागू आहे मागच्या दाखल करून घेतलेल्या नागरिकांची पालिकेला अधिकार नसताना नव्या दराने तीन पट विकास कर व प्रशमन शुल्क आकारणी करण्याचा अधिकार नाही. जर सक्तीची वसुली केली तर पालिका नगर रचना अधिकाऱयांच्या मनमानी विरुद्ध जनहित याचिका दाखल करावी लागेल ही बाब गंभीर असून मा आयुक्त यांनी तात्काळ जुन्या प्रस्ताव धारकांना दिलासा द्यावा .

 *चंदनदादा चव्हाण : राज्य प्रमुख* 
शिवसेना गुंठेवारी विकास समिती , महाराष्ट्र राज्य ,
भ्रमणध्वनी : 9421245003 दि :30 नोव्हेंबर 2021

Share

Other News