ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

या चिमुकलीच्या अपघाती मृत्युस जबाबदार कोण?...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/1/2021 8:59:32 AM


    काल हरिपूर रोड येथे रस्त्याच्या पूर्वेस एक अपघात झाला व एका लहान शाळकरी मुलीच्या डोक्यावरून उसाने भरलेला ट्रॅक्टर जाऊन मुलीचा जीव जागेवर गेला.
सदर ठिकाणी रोड च्या डाव्या बाजूला फुटपाथ च्या नावावर या चे पेंविंग ब्लॉक चे काम जे झाले आहे ते फुटपाथ म्हणून मंजूर केले आहे. पण त्या ठिकाणी या कामाची काहीही गरज न्हवती, सदर चे काम चालू केल्यापासून मी सदर कामाची मनपा मध्ये तक्रार करत आहे पण जाणीवपूर्वक मनपा अधिकारी या कडे दुर्लक्ष करत आहेत. काम पूर्ण होऊन ही रस्त्यावर मुरूम, खडी, व इतर राडारोडा उचलालेला नाही, त्यामुळेच हा अपघात घडला आहे. मी २९/१०/२०२१ रोजी याबाबत लेखी तक्रार दिली होती तरीही अद्याप काहीही कार्यवाही झाली नाही. फक्त जनतेचे पैशाची नासाडी करून नुकसान करण्याचा धंदा बांधकाम विभाग कडून चालू आहे. यात जनता ही तितकीच दोषी आहे. आपल्याला काय करायचे म्हणून दुर्लक्ष करते, एका मुलीच्या जीव गेला तर भावपुर्ण श्रद्धांजली वाहून हळहळ व्यक्त करून गप्प बसतील पण या मुलीच्या मृत्यूस जबाबदार कोण? मनपा अधिकारी की ठेकेदार की ट्रॅक्टर चालक की पोलीस प्रशासन की नगरसेवक? आता तरी जनता जागी होऊन यावर आवाज उठवेल का? कारण आज गुन्हा दाखल होईल व निर्दोष पण सुटतील पण मेले ले मुलं परत येणार आहे का? त्यामुळे हे प्रकरण राज्य पातळीवर घेऊन जाणून यामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांच्यावर कडक कारवाई होणेसाठी पाठपुरावा केला पाहिजे.

*संतोष कदम
सामाजिक कार्यकर्ते

Share

Other News