ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

* जिल्हयातील उर्दू शाळांकडे शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष व हेळसांड...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/1/2021 2:07:59 PM


 
             बंडोजी नगर उर्दू शाळा तालुका मिरज 1998 पासून स्थापना झाल्यापासून आज अखेर शिक्षक स्वखर्चाने भाडा भरून वर्ग खोल्या घेऊन चालवत आहेत . मात्र पंचायत समिती मिरज यांच्याकडे वर्गखोल्यांची मागणी केल्यावर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला गट शिक्षणाधिकारी यांनी पाठवला . आम्ही त्याबद्दल शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केले मात्र अजून यावर योग्य निर्णय झालेला नाही . 
               गेली दहा वर्षे सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शिक्षकांच्या बरोबर उर्दू व कन्नड शिक्षकांना देखील आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये समाविष्ट केले जात होते मात्र यावर्षी कुठलीही चर्चा न करता आदर्श शिक्षक पुरस्कार यांची नावे जाहीर करण्यात आली त्यामधून उर्दू व कन्नड शिक्षकांना वगळण्यात आलेला आहे जे सरासर अल्पभाषिक शिक्षकांच्या वर अन्याय आहे. या बाबीचा आम्ही निषेध करत आहोत. 
                कोकरूड उर्दु शाळा इयत्ता पहिली ते पाचवी असून आज अखेर या शाळेला देखील इमारत नाही व एकच शिक्षक गेले कित्येक वर्षे काम करत आहे. 
                  अल्पसंख्यांक शासकीय धोरणाबद्दल पूर्ण माहिती दिली जात नाही वेळोवेळी मागणी करून देखील अल्पसंख्यांक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती बद्दल उदासीनता असून प्रत्येक वर्षी फॉर्म भरण्याची संख्या कमी होत आहे . पंचायत समिती स्तरावर एक हि मीटिंग न घेता किंवा मार्गदर्शन केले जात नाही . याचेदेखील गांभीर्य नाही.
                 डॉ पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी मार्गदर्शिका पुस्तिका वाटप करण्यात आली त्यामधून देखील उर्दू शाळांना वगळण्यात आले आहे प्रत्येक वर्षी भाषांतर करून उर्दू शाळांना देखील दिले जात होते या वर्षी ते देखील झाले नाही .
                  शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी ई लर्निंग साहित्य वाटप केले जाते त्यामध्ये संगणक प्रोजेक्टर एलईडी टीव्ही व इतर साहित्य देखील वाटप होत असत जिल्ह्यात नियोजन करताना उर्दू शाळा यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे . 
             जिल्ह्यात अल्पसंख्यांक धोरणाविषयी होत असलेल्या उदासीनते बद्दल व अल्पसंख्यांक समाजातील मुलांच्या शैक्षणिक समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तसेच उर्दू शिक्षक यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल . शिक्षक भारती उर्दू यांच्यावतीने काल शिक्षणाधिकारी यांना या सर्व मुद्द्यावर निवेदन देण्यात आले आहे . *निवेदनामध्ये या विषयांवर शिक्षक भारती उर्दु संघटनेच्यावतीने शनिवारी 18 डिसेंबर रोजी सांगली जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे  .* 
             या अन्यायाविरोधात पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष आयुब बारगीर साहेब तसेच कुपवाड शहर अल्पसंख्याक अध्यक्ष सद्दाम मुजावर सर उपस्थित होते .

मुश्ताक पटेल ( राज्याध्यक्ष शिक्षक भारती उर्दू )
अशरफ मोमीन ( जिल्हाध्यक्ष भारती उर्दू)
गुलाब नदाफ ( जिल्हा सचिव शिक्षक भारती उर्दू)

Share

Other News