ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*जाती दावा पडताळणीबाबत व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थानी दिनांक २४ नोव्हेंबर पर्यंत सादर प्रस्ताव समितीने निकाली काढल्याबाबत*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 12/1/2021 8:20:22 PM

गडचिरोली,(जिमाका) दि.30: सन २०२१-२२ या सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थांनी (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमावव विमाप्र) उमेदवारांनी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पर्यंत  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,  गडचिरोली येथे सादर केलेले  होते ते सर्व प्रकरण निकाली काढण्यात आलेले आहेत. (त्रृटीचे प्रकरण वगळून) तरी व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थानी स्वत:चा ई मेल आय.डी.वर व बार्टी कार्यालयाचे https://bartievalidity.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर जावून आपली जात वैधता प्रमाणपत्राची रंगीत कॉपी काढून घ्यावी  परंतु ज्यांना अद्याप पर्यंत ई-मेल व्दारे जात वैधता प्रमागपत्र मिळालेली नसल्यास  सदर प्रस्तावामध्ये जाती दावा सिध्द करणारे  सबळ पुरावे नसल्याने त्यांचे प्रकरण त्रृटीमध्ये असल्याने  त्यांना यापुर्वी  दुरध्वनी, भ्रमणध्वनी व पत्राव्दारे त्रृटी  पूर्तता करणेसंदर्भात  कळविण्यात  आले आहे.  
     मात्र ज्या अर्जदारांनी अद्यापही त्यांचे जाती दावे पडताळणी संबंधीत आवश्यक ते  मानीव दिनांकापुर्वीचे जातीचे व वास्तव्याच्या  नोंदीचे पुरावे सादर केलेले नाहीत. अशा अर्जदारांना उमेदवारांना त्रुटी पुर्ततेकरीता संधी देण्यात येत असून, त्यांनी त्रृटी पुर्तते बाबत आवश्यक ते पुरावे मुळ प्रतीसह सादर करणेसाठी कळविण्यात आले आहे. त्रुटीपुर्ततेकरीता सबळ पुराव्यासह समिती कार्यालयात  तात्काळ उपस्थित राहावे.
     तसेच ज्या अर्जदारांचे जात वैधता प्रमाणपत्र तयार होऊनही ज्यांनी अद्याप समिती  कार्यालयात जमा असलेली मुळ जात प्रमाणपत्र नेलेले नाही, त्यांचे पालक वा सख्खे भाऊ,  बहिण  यांनी अर्जादाराचे व  स्वत:चे ओळखपत्र (मुळ व झेरॉक्स), जातवैधता प्रमाणपत्राची झेरॉक्स घेऊन तात्काळ मुळ जात प्रमाणपत्र प्राप्त करावे असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली देवसुदन धारगांवे यांनी केले आहे.
*****

Share

Other News