कबडडी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी जीवन गौरव पुस्स्कार मिळाल्याबदद्ल रामचंद्र घोडके (बापू) यांचा लोकहित मंचच्या वतीने सत्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/07/2025 9:05 PM

     सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष , आझाद व्यायाम मंडळ सांगलीचे संस्थापक अध्यक्ष , माजी राष्ट्रीय कबड्डीपटू , उत्कृष्ठ फुटबॉलपटू, क्रीडा संघटक , मार्गदर्शक , प्रशिक्षक , तत्कालीन सांगली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. नगरसेवक सांगली महानगरपालिका क्रीडा - सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व , कबड्डी खेळाचे सांगली जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख , सुंदर हस्ताक्षर व उत्कृष्ठ वक्तृत्व वाणी अशा अनेक विविध गुणांनी गुण संपन्न तसेच अनेक क्रीडा पुरस्कारांचे मानकरी असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री. रामचंद्र तुकाराम घोडके ( बापू ) यांना त्यांच्या कबड्डी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा व कबड्डी क्षेत्रातील सर्वात मोठा समजला जाणारा "स्वर्गीय कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी जीवन गौरव २०२५ " हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आज त्यांचा लोकहित मंचच्या वतीने मी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून हार्दिक अभिनंदन केले.
  
*मनोज भिसे-अध्यक्ष लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या