मुंबई दि ३,
राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री मा.ना.जयकुमार गोरे साहेब यांची मुंबई विधानभवन येथे भेट घेऊन सांगली विधानसभा मतदारसंघातील ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या देवस्थानांचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करावा अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली. यामध्ये १) विठ्ठल मंदिर,सिध्देश्वर मंदिर,बुधगांव. २) पद्मावती मंदिर,दर्गा,लक्ष्मी मंदिर,पदमाळे.३) श्री दत्तमंदिर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,बिसूर. ४) वाजुबाई मंदिर वाजेगांव. ५) श्री मारूती मंदिर,कर्नाळ. ६) श्री भैरवनाथ देवस्थान बामणोली या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. यावेळी सहकारी माजी आमदार दिनकर तात्या पाटील उपस्थित होते
तसेच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ साहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट घेतली. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय,सांगली येथील अत्यावश्यक सोयी-सुविधांच्या कामांना मंजुरी देऊन रक्कम रूपये १५ कोटी निधी मिळावा अशी मागणी केली.मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेत येत्या महिन्याभरात निधी मंजूर होईल अशी ग्वाही दिली आहे. यावेळी सहकारी अतुल माने उपस्थीत होते.