ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*नैसर्गिक नाले गेले चोरीला*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 12/1/2021 8:22:11 PM

नैसर्गिक नाले गेले चोरीला
            गतकाळात आपण       वाडया वस्त्या बघितल्या आहेत  लोकसंख्या कमी होती आपल्या अशा आकांक्षा कमी होत्या लोक मिळून मिसळून राहत होती गावातील धार्मिक. सामाजिक  सण वार. एकत्र येवून म्हणजे सुखात दुःखात एकामेकाला सहकार्य करण्याची भावना माणसात होती. राजकारण गजकर्ण नाही. कोणी नेता पुढारी नाही. असा गतकाळ होता. गाव लहान होती पण. पाऊसाचे प्रमाण जास्त होते. त्यावेळी  गावाला गटर नव्हती गावातील सांडपाणी. पाऊसाचे पाणी गावांत न घुसता गावाच्या बाजूने जात होते. कुणाच्या घरात पाणी घुसत नव्हते त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे गावातील नैसर्गिक नाले होय
           गाव वाढली आणि गावांचे रूपांतर व व शहरात झाले लोकसंख्या वाढली लोकांच्या अशा आकांक्षा अपेक्षा वाढल्या. राहणीमान बदल झाला. लोकसंख्या वाढली जमीन वाढली नाही. लोकांना घर बांधण्यासाठी  गावातील जागा कमी पडण्यास सुरुवात झाली. मग गावाला असणारे नैसर्गिक नाले यांवर लोकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. ग्रामपंचायत नियमानुसार व कमीत कमी पाच फुटांचे नैसर्गिक नाले हे सोडण्यात येत होते. ग्रामसेवक तलाठी यांना ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चया कलम ४२ मधील तरतुदीनुसार ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते. हद्द रस्ते. ग्रामीण रस्ते. गाडीमार्ग. पायवाटा. नैसर्गिक नाले. बाबत नकाशे अद्यावत ठेवून त्यावरील अतिक्रमण होणार नाही याबाबत.  ४ नोव्हेंबर १९८७ पासून वेळोवेळी शासन निर्णय जारी करत आहे. दिनांक. २२/१०/८६ ‌. पासून असणारे सर्व नकाशे अभिलेख तयार करण्याची सक्त ताकीद शासनाने दिली आहे
           आपणाला सवय लागली आहे जागा जिथ मोकळी असेल तेथे बांधकाम करून अतिक्रमण करणे हाच आपला एक फंडा आहे. आज नैसर्गिक नाले बघायला सुध्दा मिळत नाहीत. त्यामुळे. २०१४/२०१९/२०२१ रोजी आपण सांगली कोल्हापूर रत्नागिरी. या शहरात आलेला महापूर बघितला आहे. महापूराचे कारणच आहे की आपण नैसर्गिक नाले यांवर अतिक्रमण केले आहे.पाच फुटांचे असणारे नैसर्गिक नाले एक दिड फुट राहीले त्यामुळे सांडपाणी. पाऊसाचे पाणी वाहून नेण्याचे स्त्रोत लहान झाले आणि त्यामुळे पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. गतकाळातील पाऊसापेक्षा आज पाऊस जास्त नाही मानवाने झाडे तोडली त्यामुळे पाऊस काळ कमी झाला आहे. पण जमीन अतिक्रमण. नैसर्गिक नाले अतिक्रमण झाले त्यामुळे आज थोडा पाऊस पडला तरी पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. गटातील पाणी रस्त्यावर.  जागोजागी भरलेली गटर डबकी. तुबलेली संडास मुतारी.  रस्त्यावर जागोजागी डबकी. लोकसंख्या वाढली. त्यामुळे दैनंदिन गरजा वाढल्या त्यामुळे आठवडा बाजार रोजची मंडयी.  यामुळे जागोजागी बाजारातून निघणारा ओला कचरा. नासकी कुजकी फळे. यामुळे सर्व वातावरण दुषित पाणी दुषित. हे सर्व कुजणयामुळे. त्यातून होणारें इन्फेक्शन. यामुळे मलेरिया काविळ डेंग्यू. हिवताप. असे महाभयंकर महामारी आजार पसरतात त्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. 
             परवा आपण कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाचा सामना केला आहे जीवन वाचविण्यासाठी आपण उपाशी तापाशी राहून आपण जगलो या सर्व परस्थितीला आपणच कारणीभूत आहोत कारण आपणं खाण पान बदलले स्वच्छता याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपणास हा सर्व प्रकार भोगावा लागला आहे
    ‌.        नैसर्गिक नाले हा सर्वात मोठा स्वच्छतेचा स्त्रोत होता आपणच तो नष्ट केला आहे. आज ज्या ज्या शहरात एम आय डी निर्माण झाली आहे त्यांनी  नैसर्गिक नाले यांवर फार मोठें अतिक्रमण केले आहे आपण एवढे स्वार्थी झालो आहोत की. स्मशानभूमी. चया भिंतीला आपल्या घराची भिंत बांधण्यास सुरुवात झाली.  समाजमंदिर सुध्दा आपण बळकावली.  एवढेच काय जुन्या विहीरी बुजवून त्यावर सुध्दा घर बांधली. एवढा मोठा स्वार्थ आमच्यात आहे  आपल्या परिसराच्या आजूबाजूला मोकळे भुखंड आहेत का ? त्यावर वाढणारे झाडे झुडपे. साठणारे घाण सांडपाणी याबाबत संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका संबंधित भूखंड धारकांना त्या भूखंडांची स्वच्छता करण्याची नोटीस बजावली जाते का ? 
      आजच आपल्या गावाला शहराला. नैसर्गिक नाले होते का ? कुठे होते ? किती होते ? किती फुटांचे होतें ? आत्ता काय परस्थिती आहे नैसर्गिक नाले अस्तित्वात आहेत का ? कोणी अतिक्रमण केले आहे का ? अतिक्रमण करणारा नामांकित व्यक्ती आहे का ? अधिकारी व कर्मचारी यांनी या अतिक्रमणा बाबत गांधारी भूमिका घेतली आहे का ? आजच माहिती अधिकार दाखल करून माहिती घ्या. आणि आज सर्वात मोठें असणारे नैसर्गिक नाले किती फुटाचे शिल्लक आहेत ? याची माहिती मिळवा. 
           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९ 
बोगस बांधकाम कामगार नोंदणी साठी जबाबदार असणारे. ९० दिवसांचे प्रमाणपत्र देणारे इंजिनिअर यांची चौकशी करणेबाबत समिती नेमण्यात यावी यासाठी. पुणे. सातारा. सांगली. सोलापूर. कोल्हापूर. या पाच जिल्ह्यांतून खरोखरच बांधकाम कामगार यांच्या हक्कासाठी. आंदोलन उभे करणार आहोत आमच्या मताला सहमत असणारे यांनी आप आपल्या जिल्ह्यातून  आंदोलन करण्याची तयारी करा 
खालील मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे
*. जो इंजिनिअर ९० दिवसांचे प्रमाणपत्र देत आहे
* त्या इंजिनिअर यांनी ९० दिवसांचे बांधकाम कामगार याचे हजेरी पत्रक जोडणे बंधनकारक करा
* जो इंजिनिअर रोजच्या रोज बांधकाम कामगार यांना पगार देत असेल तर तसे शपथ पत्र देणे बंधनकारक करा
*. जो इंजिनिअर बांधकाम कामगार याचा पगार बॅंक मार्फत देत असेल तर. बॅंक रिपोर्ट जोडणे बंधनकारक करा
*. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडे इंजिनिअर यांनी नोंदणी रजिस्ट्रेशन केले आहे का
* इंजिनिअर यांना किती बांधकाम कामगार नोंदणी किती प्रमाणात देणें मंडळाने ठरवून दिले आहे

Share

Other News