सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व हरपले :- पालकमंत्री जयंत पाटील

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/01/2022 8:47 AM


*** प्रा. एन. डी. पाटील यांना श्रध्दांजली...
 
 सांगली, दि १७,
    प्रा. एन. डी. पाटील यांनी निस्पृहपणे शेतकरी, कामगार वर्गासाठी आयुष्यभर जोमाने  संघर्ष  केला. अत्यंत अक्रमक शैलीत आयुष्यभर सत्तेच्या विरोधारात राहुन लढा देण्याची भूमिका त्यांनी स्विकारली.  प्रा. एन. डी. पाटील हे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व हरपले, अशा शब्दात जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रध्दांजली अर्पण केली .
 पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रा. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत पारदर्शिपणे रयत शिक्षण संस्थेने कार्य केले. त्यांच्या निधनाने अनेकांचे नुकसान झाले आहे. विशेषत: वाळावा तालुक्यातील जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील भूमी क्रांतीकारकांना, विचारवंताना, समाजसुधारकांना जन्म देणारी भूमी आहे. या भूमीत प्रा. एन. डी. पाटील यांचा ढवळी येथे जन्म झाला. शिक्षणाच्या समार्थ्यांवर त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी गाठलेली मजल मोठी आहे. ती गाठत असताना सत्तेच्या वळचणीला न बसता, संघर्ष हाच आपल्या आयुष्याचा प्रमुख भाग बनविला. प्रा. एन. डी. पाटील हे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारी नेतृत्व होते. कोल्हापुरात राहुन त्यांनी कोल्हापुरकारांच्या अनेक प्रश्नांची तड लावली. अशा या थोर नेत्याचे निधन झाले असून त्यांना भावपुर्ण श्रध्दाजंली ! 

Share

Other News

ताज्या बातम्या