ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

योगिता ताई पुन्हा झाल्या नगराध्यक्ष पदावरून अपात्र...


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 1/18/2022 9:32:36 PM


गडचिरोली शहरातील नागरिकांनी भरभरून मतदान करून एकहाती सत्ता  भाजप पक्षाला दिली होती.परंतु एक हाती सत्ता दिल्याने गडचिरोली शहराची मतदारांची परतफेड म्हणून, शहराची नाचक्कीने होईल असे कधीही वाटले नव्हते. नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी आपल्या खाजगी वाहनात डीजल भरण्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखोंचा निधी खर्च केल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्ष पदावरून पायउतार केल्याचे आदेश नगरविकास मंत्रालयातून दोन वेळा निघाले होते.पण अगडबंब  विद्वान कायदे पंडितांना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयात अपात्र आदेशाला रद्दबातल ठरविण्याचा प्रयत्न योगिता ताई नी केलेला होता.
आज 17 जानेवारी रोजी नगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुद्दत संपल्याने, प्रशासक म्हणून उप विभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आज पुन्हा नगरविकास मंत्रालयातून  योगिता पिपरे यांना पायउतार केल्याचे अधिकृत आदेश देण्यात आलेला असून,त्या आदेशाची प्रत महाराष्ट्र माझा न्यूज च्या हाती लागलेली आहे. महाराष्ट्र राज्यात सलग तीन वेळा नगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्याचे  रेकॉर्ड गडचिरोली नगराध्यक्ष यांच्या नावाने प्रसिद्ध होणार असल्याचे विदारक वास्तव चित्र मतदारांच्या समोर उभे ठाकलेले आहे. सदर च्या  आदेशात नगराध्यक्ष पदावरून पायउतार केल्याचे स्पष्ट उल्लेख केला आहे.वारंवार मंत्रालय आणि गडचिरोली नगराध्यक्ष यांच्यात कलगीतुरा रंगला होता. परंतु नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यालयातून पाठविलेला आदेश आज गडचिरोली नगर पालिकेत धडकल्याने, महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून , पुढे होणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघडीच सत्ता काबीज करणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे.

Share

Other News