ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

डॉ रियाज मुजावर यांचा असा हा मनाचा मोठेपणा , संभाजी भिडे गुरुजींसाठी स्वःताच्या पुरस्कार सोहळयाला जाणे टाळले...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 4/30/2022 8:23:06 AM


   माननीय श्री डॉक्टर रियाज मुजावर सर खरंतर तुमच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे कारण अगदी कमी वयामध्ये आपण जी रुग्णांना दिलेली सेवा आहे ती अप्रतिम आहे अनेक गोरगरिबांचे तुम्ही जीव वाचवले आहे त्यातलाच एक मी पण आहे आजची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्र व देशामध्ये जातीवादाचा बकासुर रुपी करोणा पेक्षा घातक विषाणू या राजकारण्यांनी पसरविला आहे
     अशी घातक परिस्थिती असताना देखील आपण नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड आपणास पुरस्कार मुंबई सहारा स्टार हॉटेल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज व अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत दिनांक 28 /4/022 रोजी मिळणार होता परंतु दिनांक 27/4/022 रोजी आदरणीय गुरुवर्य हिंदुत्वाची धगधगती मशाल माननीय संभाजी भिडे गुरुजी यांचा अपघात झाला व आपणास त्यांच्या ऑपरेशन पूर्व तपासणीची जबाबदारी देण्यात आली व तुम्ही कोणताही विचार न करता इतक्या मोठ्या पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेऊन माननीय गुरुजी यांच्या तब्येतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे मी कार्यक्रमास येऊ शकणार नाही असे आवर्जून बोललात खरं स्वार्थ न बघता जात पात धर्म भेद न बघता आज जे विकृती पसरविण्याचा गैरप्रकार करणाऱ्या सर्व क्षेत्रातल्या जातीवादी लोकांना एक चांगला संदेश देण्याचे काम केले आहे हो आम्ही जातीन कुणीही असो परंतु आम्ही एक भारतीय जबाबदार नागरिक व डॉक्टर आहोत आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव आमचे सण असो सुख दुख असो शेजार धर्म असो आम्ही एकमेकाला सदैव साथ देऊन आपली जबाबदारी पार पाडू असे थोर विचार
    तुमच्यासारख्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाला माझा मनापासून सलाम मा. रियाज सर जर तुमच्यासारखं सगळ्यांनी विचार केला तर जातिवाद हा पूर्णतः आपल्या देशातून 100% संपून जाईल.
 
महेन्द्रभाऊ चंडाले , शिवसेना सांगली
जय हिंद जय महाराष्ट्र

Share

Other News