देसाईगंज:
   शासकीय यंत्रणेतील गावपातळीवरच्या प्रशासकीय कर्मचाऱ्याने आपल्या कर्तव्याची जाण ठेऊन प्रामाणिकपणे गावातील प्रत्येकाला विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ देऊन, सर्व सरकारी विभागांनी आपापसात ताळमेळ ठेऊन महाराजस्व अभियान यशस्वी करावे असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.                               ते देसाईगंज तहसील कार्यालयाच्या वतीने मौजा  पोटगाव येथे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात  घेण्यात आलेल्या आजादी का अमृतमहोत्सव व महाराजस्व अभियान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घघाटक म्हणून बोलत होते. 
        कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे.पी.लोंढे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज चे प्रभारी तहसीलदार ए. पी. पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी , पंचायत समिती देसाईगंज चे प्रभारी संवर्ग विकास अधिकारी सुखदेव थोटे..... , तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम, पंचायत समिती सदस्य अशोक नंदेश्वर, ग्राम पंचायत पोटगाव चे सरपंच विजय दडमल, उपसरपंच पंकज वंजारी, ग्राम पंचायत पिंपळगाव चे सरपंच रामचंद्र राऊत, उपसरपंच प्रकाश उरकुडे, ग्राम पंचायत विहिरगाव च्या सरपंचा भारती सुरेश जुगनाके, उपसरपंच सारंगधर शंभरकर, कोंढाळा ग्राम पंचायत च्या सरपंचा अपर्णा राऊत ,  कोकडी ग्राम पंचायत चे सरपंच केवलराम टिकले, किन्हाळा ग्राम पंचायत च्या सरपंचा ज्योती श्रीरामे  तथा परिसरातील सर्व ग्राम पंचायत चे सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्त समिती चे अध्यक्ष उपस्थित होते .
पुढे बोलताना आ.गजबे म्हणाले की,,शिधापत्रिका धारकांचा व धान्य खरेदीचा इष्टांक वाढविण्यासाठी आपण सर्वतोपरी  वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
 अध्यक्षस्थानावरून बोलताना उपविभागीय अधिकारी लोंढे म्हणाले की, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक बनवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्षम व्हावे शासन आपल्या दारी या माध्यमातून नागरिकांनी केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
 महाराजस्व अभियानात महसूल प्रशासन,कृषी विभाग,आरोग्य विभाग,अन्न व पुरवठा विभाग,वन विभाग,शिक्षण  विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय,पंचायत विभाग,सामाजिक वनीकरण, व्यसन मुक्ती केंद,संजय गांधी निराधार,  आदी विभागांनी स्टॉल लावून लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,संगनिकृत वनहक्क सातबारा, शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे ,नैसर्गिक आपत्ती  व अतिवृष्टी धनादेश वाटप तालुका, कृषी  अधिकारी कार्यालय देसाईगंज च्या वतीने हिराजी भिका बुल्ले याना ट्रॅक्टर, भुमेश्वर हिराजी बुल्ले यांना , रोटावेटर अरविंद आत्माराम आंबेडरे यांना मळणी यंत्र  देण्यात आले .सिंचन विहीर काम पूर्ण झाल्याचे प्रमाण पत्र ,प्रधान मंत्री आवास योजना कार्य  आरंभ आदेश वितरित करण्यात आले.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तहसीलदार  पिसाळ यांनी केले तर,संचालन  दिलीप कहूरके यांनी केले  आभार  प्रदर्शन सावंगी चे तलाठी वनकर यांनी केले .
                  कार्यक्रमाला विविध खात्याचे अधिकारी,कर्मचारी,सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,मंडळ अधिकारी,तलाठी,शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.