ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,गडचिरोली (कंत्राटी) पदाचे पदभरतीसंदर्भाने प्राप्त अर्जापेकी पात्र अपात्र ची यादी प्रसिध्द*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 7/1/2022 8:17:39 PM

गडचिरोली, दि.०१ : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गडचिरोली हे कंत्राटी पद रिक्त असून सदरचे पद तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर करार पध्दतीने जिल्हा निवड समितीमार्फत भरण्याची कार्यवाही करीता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक १९ जुन, २०२२ ते दि. ३० जुन, २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. सदर प्राप्त अर्जांची छाननी दिनांक १ जुलै, २०२२ रोजी गठीत समितीव्दारे करण्यात आलेली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या एका पदासाठी १४२ अर्ज आले पैकी २२ पात्र तर १२० अपात्र अर्ज आहेत. पात्र/ अपात्र यादी ही जिल्हा प्रशासनाची अधिकृत वेबसाईट https://gadchiroli.gov.in/notice_category/recruitment/ यावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
तसेच सदर पदभरती संदर्भाने पुढिल टप्यांकरिता सर्व उमेदवारांनी वेळोवेळी सदर वेबसाईटचे आवलोकन करणे त्यांचे हिताचे राहील. याकरिता या कार्यायाकडून कुठलेही स्वतंत्र पत्रव्यवहार वा दूरध्वनी केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. यादी सर्व उमेदवारांचे ई-मेल आयडी वर पाठविण्यात येणार आहे. सदर यादी प्रसिध्द केल्यानंतर ज्या उमेदवारांना आक्षेप हरकती घ्यावयाचे असतील त्यांनी दिनांक ५ जुले, २०२२ चे सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आक्षेप या कार्यालयाचे [email protected] ई-मेल वर केवळ ऑनलाईन पद्धतीने पाठवावे. मुलाखतीकरिता अंतिम यादी वरीलप्रमाणे आक्षेपांचे निरसन करुन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती प्राधिकरण, गडचिरोली यांनी सांगितले आहे.

Share

Other News