*सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत 75 कि.मी. अमृत महोत्सव दौडचे आयोजन*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 14/08/2022 6:53 PM


आर टी आय न्यूज नेटवर्क
सातारा/प्रतिनिधी 
*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त*

*सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत 75 कि.मी. अमृत महोत्सव दौडचे आयोजन*

  सातारा दि. 14 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 25 जुलै ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने  75 कि.मी. अमृत महोत्सव दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडचा सांगता समारंभ आज दि. 14 ऑगस्ट रोजी अंतिम 10 कि.मी. दौडसह पोलीस कवायत मैदान सातारा येथे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

  या दौडमध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय तसेच सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व शाखांमधील एकूण 42 अधिकारी व 529 पोलीस अंमलदार तसेच 30 होमगार्ड व इतर नागरिक यांनी सहभाग घेतला होता. 

 सकाळी 7 वा. पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात केली. ही दौडा पोलीस कवायत मैदान-जुना आरटीओ चौक-भुविकास बँक-मोळाचा ओढा-मेढा रोड-कोंडवे पासुन पुन्हा पोलीस कवायत मैदान  सातारा अशा मार्गाने घेण्यात आली. या दौडमध्ये पुरुष गटामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलातील तेजस संतोष कर्णे पोकॉ. ब.नं.994 यांनी प्रथम क्रमांक, प्रल्हाद मोहन ढाकरे पोकॉ 1385 यांनी द्वितीय तर रामदास अर्जुन बेंडकोळी पोकॉ 761 यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तर महिला गटामध्ये लता निजा पाडवी मपोकॉ 2482 यांनी प्रथम क्रमांक, वर्षा यशवंत देशमुख मपोकॉ 1268 यांनी द्वितीय तर मयुरी अशोक कुंभार मपोकॉ 1003 यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सर्व विजेत्या पोलीस अंमलदार यांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते पदक, बक्षीस व ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले. 

Share

Other News

ताज्या बातम्या