मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलची मान्यता रद्द करून संस्था चालकावर कठोर कारवाई करू, शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन : लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली होती मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/07/2025 10:26 PM

 सांगली प्रतिनिधी 
         कवठेमंकाळ तालुक्यातील मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या मारहाणी बाबत संस्थाचालक मोहन माळी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे तसेच संस्थेची मान्यता ही रद्द करण्याचे आश्वासन लोकहित मंचचे अध्यक्ष म्हणून भिसे यांना शिक्षण मंत्री दादासो भुसे यांनी दिले आहे.                    
    सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यामध्ये जत रोडवरील मोहनराव माळी इंटरनॅशनल स्कूल असून, या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थाचालक मोहन माळी यांनी बेदम मारहाण करत रक्तबंबाळ केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली . या शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये अळ्या किडे आढळून येत असल्याच्या तक्रारी  इथल्या विद्यार्थ्यांनी केल्या.                           
              अशा तऱ्हेने जर एखाद्या संस्थेच्या संस्थाचालकाकडूनच अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांना बेदमपणे, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली जात असेल, त्यांच्या आरोग्याशी खेळले जात असेल तर या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी. अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादासो भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत केली होती. या मागणीला प्रतिसाद देत शिक्षण मंत्री दादासो भुसे यांनी सदर स्कूल वर आणि संबंधित संस्थांचालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या