मिरज शहरातील जगद्ज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा चबूतऱ्यासह बसविण्यासाठी अंतिम मंजुरी दिल्याबद्दल जिल्हाअधिकारी मा.अशोक काकडे साहेब यांचा लिंगायत समाजाकडुन सत्कार करण्यात आला.
माजी पालकमंत्री आ.मा.जयंत पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आणि माजी स्थायी समिती सभापती सौ.संगीता हारगे व श्री.अभिजीत दादा हारगे यांच्या अथक प्रयत्नाने श्री.महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या चबूतऱ्यासह पुतळा बसविण्यास परवानगी मिळाली.
मिरज शहरातील लिंगायत समाजबांधवांकडून जिल्हाधिकारी मा.अशोक काकडे साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी स्थायी समिती सभापती सौ संगीता हारगे, माजी नगरसेवक मा.राजेंद्र कुंभार,मा.गजेंद्र कल्लोळी,मा.विराज कोकणे,माजी नगरसेवक मा.प्रसाद मदभावीकर,मा.विजय दादा माळी,मा.जयगोंड कोरे.मा.विक्रम पाटील,मा.ईश्वर जनवाडे,मा.आकाश कांबळे,मा.अनिल हारगे,मा.रमेश मेंढे,मा.दादा(अनिल)पाटील,मा.सौरभ कुलकर्णी,मा सौरभ ताशीलदार,मा.उमेश हारगे,मा.महेश बसरगे,मा.प्रदीप कोरे,मा.बंडू लकडे,मा.चिन्मय हारगे यांचासह समाजबांधव उपस्थित होते.