*उपोषणाच्या पहिल्याच दिवशी शिक्षण संचालकाने घेतली दखल!* *अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संघर्षाला अखेर यश!*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 20/03/2023 6:43 PM

पुणे प्रतिनिधी: अन्याय अत्याचार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने  बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर येथील  नियमबाह्य शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती रद्द कराव्या व सहसंचालक कार्यालय नांदेड येथील संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हे नोंदवून निलंबित करण्यात यावे या मागणी साठी बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात आले होते परंतु उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उच्च शिक्षण संचालक यांनी दखल घेऊन सहसंचालक कार्यालय नांदेड येथे आदेशित केले की पंधरा दिवसाच्या आत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावे. कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर येथील कर्मचारी श्री.संजय मोरे, श्री.जाधव दिलीप कुमार व श्री.जाधव दत्तात्रेय या कर्मचाऱ्यांच्या झालेल्या नियुक्तींची चौकशी करण्यात यावी. सदरील नियुक्त्या या नियमबाह्य झालेल्या आहेत हे वेळोवेळी सहसंचालक कार्यालय नांदेड यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही सदरील कार्यालयाने या प्रकरणाकडे डोळेझाक केली त्यामुळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने सदरील प्रकरणाचा पाठपुरावा उच्च शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांच्याकडे केला. दिनांक २० मार्च 2023 पासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली, त्यानंतर उपोषणाच्या पहिल्याच दिवशी श्री.शैलेंद्र देवळणकर उच्च शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून उपोषणाची दखल घेण्यात आली श्री.हरिभाऊ शिंदे व श्री.बच्छाव यांनी श्री.सौदागर महमदरफी संस्थापक अध्यक्ष अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती यांच्यासोबत चर्चा करून, सहसंचालक कार्यालयातील कर्मचारी श्री.वसंत मारुती पवार व बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर येथील शिक्षकेतर कर्मचारी यांच्या चौकश्या करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तसेच चौकशीचा अहवाल श्री.सौदागर महमदरफी यांनाही देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर उपोषणातून माघार घेण्यात आले.
हा उपोषण संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी व प्रदेश उपाध्यक्ष अॅड. संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले याप्रसंगी उपोषण कर्ते मराठवाडा अल्पसंख्यांक अध्यक्ष अजीम शेख, बीडचे लहू लांडगे, अशोक नलावडे, पुणेचे इस्माईल शेख, आकाश सोनफुले, लातूरचे तानाजी भंडे, व्यंकट कदम व इतर पदाधिकारी उपोषणात सहभागी होते.

Share

Other News

ताज्या बातम्या