ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सांगली रेल्वे स्टेशन , सुसाट जाणाऱ्या एक्सप्रेस गाडया पहाण्याचे पर्यटन स्थळ ...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 3/21/2023 10:43:46 AM

सांगली रेल्वे स्टेशन -  न थांबता सुसाट जाणार्या गाड्या पाहण्याचे स्थळ बनत आहे.

रेल्वे बोर्ड ओखा-वास्को ही नविन रेल्वे गाडी सुरू करणार असून या गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आलेला नाही.

सांगली रेल्वे स्टेशन हे पुणे विभागात खूपच चांगले उत्पन्न देत असून बऱ्याच रेल्वे गाड्यांना एका फेऱ्यांमध्ये सोळा हजार पेक्षा जास्त उत्पन्न सांगली रेल्वे स्टेशन देत आहे

वरील गणिताप्रमाणे सुमारे एक कोटी 17 लाख रुपयांचे उत्पन्न सरासरी एका गाडी मागे सांगली रेल्वे स्टेशन वरून मिळते

तरीही रेल्वे बोर्ड व मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे महापालिका मुख्यालय व जिल्हा मुख्यालय सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात येत नाही.

सांगलीत विमानतळ तर नाही पण रेल्वेही नाही अशी परिस्थिती आता झालेली आहे.

सांगली रेल्वे स्टेशनच्या नजीकच असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या हळदी बाजारपेठ गुळ बाजार पेठ बेदाणा बाजारपेठ तसेच सांगली शहरातील असंख्य उद्योग धंदे हॉस्पिटल कारखाने व इतर व्यवसायांना याचा खूप मोठा फटका बसत आहे.

एक तर विमानतळ नाही म्हणून मोठे उद्योग येथे येत नाहीत.

त्याचबरोबर रेल्वे गाड्या पण सांगलीत थांबत नाहीत त्यामुळे छोटे व्यवसायिकांनी देखील सांगली शहरावर पाठ फिरवली आहे.

पुणे महसूल विभागात वर्षानुवर्षे पुण्यानंतर अग्रेसर असणारा सांगली जिल्हा आता शेवटच्या स्थानावर पोहोचेल असे वाटत आहे.

सांगली जिल्हा व सांगली रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या प्रचंड अन्यायात वर सांगलीच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन त्वरित सांगली रेल्वे थांबवा मंजूर करून घेण्याची गरज आहे.

सांगलीकरांनी देखील सांगली रेल्वे स्टेशन हे आपले रेल्वे स्टेशन मानून सांगली स्टेशनवर जाऊन रेल्वे स्टेशन मास्तर कडे तक्रार पुस्तकांमध्ये आपला विरोध दर्शवावा....


 त्याशिवाय रेल्वे प्रशासन जागे होणार नाही...

Share

Other News