आवाहन

BREAKING NEWS

शेडयाळ, जत येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/1/2023 7:48:09 AM


शेड्याळ येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील प्रमुख चौकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी सरपंच तायव्वा थोरात व उपसरपंच उषाताई जाधव यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. व ग्रामपंचायत येथे नूतन सरपंच भगवानदास केंगार यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
व महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास विभागातून महिला  ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार माजी सरपंच सौ तायवा थोरात व अंगणवाडी सेविका अहिल्याबाई सातपुते. यांना शाल श्रीफळ व सन्मानाचिन्ह व पाचशे रुपये देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गावचे नुतन सरपंच भगवानदास केंगार. उपसरपंच उषाताई जाधव. माजी सरपंच अशोक जाधव. माजी उपसरपंच कर्याप्पा गुगवाड. ग्रामपंचायत सदस्य म्हाळाप्पा हावगोंडी.तम्माणा गुगवाड.विद्याधर जाधव. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गुगुवाड. ग्रामसेवक सुदर्शन जाधव. ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण जाहीर. अशोक तेली. माजी सरपंच तमाणा हावगोंडी.नागेश हावगोडीं .सुरेश नरुटे.नितिन नरुटे.केंचापा गुगवाड. हणमंत गुगवाड. सागर थोरात.म्हाळापा कोटनोळी.कुमार हावगोडीं . भाऊ जाधव. यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश नरुटे यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या