भंडारा जिल्ह्यात आज कोरोनाचा उद्रेक तब्बल 49 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

  • लक्ष्मण फुंडे (पवनी)
  • Upadted: 09/07/2020 7:25 PM

 बरे झालेल्यांची संख्या 79  पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 155  क्रियाशील रुग्ण 76 भंडारा जिल्हा प्रतिनिधी :- लक्ष्मण फुंडे भंडारा दि.9 :- जिल्ह्यात आज एकाच दिवशी विक्रमी 49 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून यात साकोली 27, भंडारा तालुक्यातील 04, तुमसर 06, लाखनी 11 व पवनी तालुक्यातील एक व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 79 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 155 झाली असून 76 क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 79 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज 49 नव्या रुग्णाची भर पडली असून जिल्ह्यात आता 76 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 155 एव्हढी आहे. 152 अहवालाचीप्रतिक्षाआहे. आतापर्यंत 4929 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 155 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 4622 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 152 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आज 9 जुलै रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 32 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 506 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर,लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी येथे 449 भरती आहेत. 3878 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे, मुंबई व इतर राज्यातून 44765 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 42019 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 2746 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या