लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी घेतला संजयनगर पोलीस ठाण्याचा आढावा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/03/2024 12:10 PM

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संजयनगर पोलीस ठाण्यात सांगलीचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक मा.संदीप घुगे साहेब तसेच सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी ( DYSP) मा.आबासाहेब जाधव,संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.बयाजी कुरळे सो यांच्यासोबत स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेत बैठक पार पडली.

पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक नागरिकांशी संवाद साधत संजयनगर पोलीस हद्दीत सुरक्षेच्या दृष्टीने काय काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा करत एरियानुसार आढावा घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने भूमिका व्यक्त करत पंचशीलनगर आठवडी बाजाराबाबत बिट मार्शल सुरु करण्यात यावे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत काही सूचना मा.पोलीस अधीक्षकांसमोर मांडल्या.तसेंच माधवनगर कर्नाल् रोडवरील रात्रीच्यावेळी लुटमारीचेप्रकार होतात तेपण सांगण्यात आले.

नागरिकांकडून सूचना तसेच उपाययोजना मागवून त्यानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना बैठकीदरम्यान देण्यात आल्या.
सांगलीला लाभलेले नवनियुक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यशैलीने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.      


Share

Other News

ताज्या बातम्या