जिल्हाधिकाऱ्यांनी १०० फुटी रस्त्याच्या कामाचे निरीक्षण करावे, लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसेंची मागणी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/03/2024 3:15 PM

प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब, सांगली.

विषय -शंभर फुटी रस्त्याचे निरीक्षण होण्याबाबत...

माननीय महोदय,

   100 फुटी असे नाव असलेल्या परंतु प्रत्यक्षात जास्तीत जास्त 60 फुटी भरणाऱ्या, 40 फुटापर्यंत अतिक्रमण झालेल्या, तांत्रिक दृष्टीने कमकुवत आणि आर्थिक दृष्टीने प्रचंड अनियमित्ता झालेल्या रस्त्याला वाचवण्यासाठी आणि त्या रस्त्याला सांगलीतील एक आदर्श रस्ता बनवण्यासाठी आम्ही सर्व सांगलीकर जनतेच्या प्रतिनिधीच्या रूपाने लोकहित मंचच्या द्वारे शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करत आहोत. 
महोदय सध्य परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेचे आयुक्त व दोन्ही उपायुक्त यांची बदली झालेली आहे त्यांची पदे रिक्त आहेत या परिस्थितीत शंभर फुटी रस्त्याच्या समस्या मांडण्यासाठी व त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आमच्या दृष्टीने आपणच एकमेव अशा स्थान आहात.  
प्रस्तावित निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आपण अतिशय व्यस्त आहात हे आम्हास ज्ञात आहे तरीही शंभर फुटी रस्ता वाचवावा म्हणून आम्ही सर्व लोकहित मंच च्या द्वारे आपणास कळकळीची विनंती करत आहोत की आपल्या अतिशय व्यस्त दैनंदिन कार्यातून फक्त थोडा वेळ, कमीत कमी एक तास काढावा व आपण प्रत्यक्ष शंभर फुटी रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी भेट द्यावी. 
आपण प्रत्यक्ष भेट दिल्यास सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपणास त्या रस्त्याची सध्य परिस्थिती व लोकांच्या रस्त्याबाबतच्या समस्यांची त्यामध्ये झालेल्या अनियमिततेची जाणीव होईल. दुसरे त्यामुळे कार्यकत्राटदार व रस्ता बांधकाम करणारे यांच्यावर रस्त्याचे बांधकाम गुणवत्ता पूर्ण व्हावे रस्ता मजबूत व्हावा याबाबत दबाव निर्माण होईल.  त्यामध्ये तांत्रिक व आर्थिक भ्रष्टाचार करण्याची हिम्मत कोणामध्ये राहणार नाही. तिसरे म्हणजे आम्ही दिलेल्या पत्रामध्ये उल्लेखित समितीची आवश्यकता साधक चर्चेद्वारे योग्य त्या सूचना व दुरुस्तीसह आपण आपल्या अध्यक्षतेखाली प्रस्थापित करता येणे शक्य होईल. या सर्व गोष्टींचा उपयोग शंभर फुटी रस्ता सर्व लोकांच्या हिताच्या दृष्टीने अतिक्रमण नसलेला टिकाऊ मजबूत पर्यावरणास मदत करणारा एक आदर्श रस्ता म्हणून नावाजला जाईल. आज पर्यंत आपले जे  मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन आम्हाला मिळालेले आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. असेच मार्गदर्शन व सहकार्य मिळावे या अपेक्षेसह सविनय सादर.

आपला,
मनोज भिसे,
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या