१०० फुटी रस्ता आदर्श रस्ता म्हणून नावारूपास येण्यासाठी लोकहित मंचचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरीना पत्र

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/03/2024 7:23 PM

प्रति माननीय नितीन गडकरी जी साहेब

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
भारत सरकार

विषय सांगली येथील शंभर फुटी रस्त्याच्या बांधकामामध्ये  होणाऱ्या अनियमिततेची चौकशी करून सदर रस्ता टिकाऊ मजबूत व पर्यावरण पूरक होण्या बाबत विनंती
संदर्भ:- माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांना दिलेले पाठीमागील पत्रांचे संदर्भ

महोदय उपरोक्त विषयास अनुसरून आम्ही सर्व सांगलीचे सुजाण नागरिक लोकहित मंच सांगली यांच्यामार्फत प्रतिनिधिक स्वरूपात आपणास खालील प्रमाणे विनंती करत आहोत. 
शंभर फुटी रस्ता सांगली शहराच्या शरीरामधील एका महाधमणीचे कार्य करीत आहे. कोल्हापूर या मोठ्या शहराकडून येणाऱ्या वाहतुकीचा  सांगली मिरज रस्त्यावर ताण पडू नये,  स्टेशन रोड सिव्हिल हॉस्पिटल रोड मारुती रोड हारभट रोड तसेच झुलेलाल चौक सिविल चौक व कर्मवीर चौक या ठिकाणचा वाहतुकीचा ताण व वाहतुकीचे कोंडी टाळण्यासाठी 100 फुटीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. 
परंतु या शंभर फुटी ला महोदय अतिक्रमण रस्ता बांधकामातील तांत्रिक अनियमितता आर्थिक भ्रष्टाचार यांची लागण झालेली आहे. उपरोक्त संदर्भीय पत्रांमुळे लोकहित, मंच च्या मार्फत आम्ही वारंवार या गोष्टी थांबवण्यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा करत आहोत. त्यापैकी काही प्रमुख बाबी खालील प्रमाणे
1. शंभर फुटी रस्ता हा फक्त नावाला शंभर फुटी राहिला असून प्रत्यक्ष मोजून पाहिले असता दोन्ही बाजूच्या झालेल्या अतिक्रमणामुळे हा रस्ता जास्तीत जास्त 60 फुटी राहिलेला आहे. दोन्ही बाजूचे व्यापारी हॉटेल व्यावसायिक हात गाडी वाले गॅरेज वाले फॅब्रिकेशन व्यावसायिक इत्यादींनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे
2. महानगरपालिकेकडून इतर ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते परंतु शंभर फुटी रस्त्याकडे महानगरपालिका व अतिक्रमण हटाव करणारे फिरकत नाहीत हे कटू वस्तुस्थिती आहे
3. दिनांक अमुक अमुक रोजी आम्ही दिलेला निवेदनानुसार डी मार्ट शेजारी या रस्त्यावर मोठे भगदाड पडले होते यामुळे या रस्त्यावरून जाणारी लहान मुले वयोवृद्ध व दुचाकी स्वार यांची जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती याकडे कोणत्याही शासकीय यंत्रणेने लक्ष दिले नाही
4. रस्त्याचे बांधकाम करणाऱ्यांनी या रस्त्याचे बांधकाम अतिशय तकलादु, कमकुवत स्वरूपाचे केलेले आहे त्याची जाडी पावसाचे पाणी साठवू नये म्हणून केलेली उपाययोजना चौक अथवा तीव्र वळण असणाऱ्या ठिकाणी योग्य ते स्पीड ब्रेकर अथवा रेम्ब्लर यामध्ये योग्य मापदंड वापरले गेलेले नाहीत याची तपासणी संबंधित शासकीय यंत्रणेने केलेली नाही. 
5. महोदय यामध्ये भर म्हणून की काय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेचे आयुक्त व दोन्हीही उपयुक्त यांची बदली झालेली आहे सध्या परिस्थितीत ही पदे रिक्त असल्यामुळे शंभर फुटीचा रस्त्यांच्या समस्या निराकरणासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब हेच एकमेव आमचे आशास्थान आहेत
6. परंतु त्यांच्या कार्य व्यस्ततेमुळे व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या कार्यामुळे त्यांना सातत्याने शंभर फुटीच्या कामावर लक्ष देणे अशक्य आहे असे वाटते त्या अनुषंगाने आम्ही सर्वांच्या वतीने या कामाची गुणवत्ता तपासणी कामे आर्थिक अनियमित्ता थांबवण्यासाठी रस्त्याचा दर्जा वाढवण्यासाठी व शंभर फुटी रस्ता पर्यावरण स्नेही होण्यासाठी एक निष्पक्ष व सर्वसमावेशक तांत्रिक आर्थिक सामाजिक प्रतिनिधी असणारी समिती स्थापन करण्याची विनंती मान्य कलेक्टर साहेब यांना केलेली आहे त्याबाबतची पाठीमागील सर्व पत्रे सोबत जोडत आहे
7. महोदय 100 फुटी रस्ता हा मजबूत टिकाऊ व पर्यावरण स्नेही व्हावा या दृष्टीने शक्य ते सर्व काही करण्याची आमची तयारी आहे लोकसहभागातून फुलझाडे झुडपे व अन्य सुशोभीकरण करण्याची आमची तयारी आहे
महोदय आमच्या सर्वांच्या मनात आपली प्रतिमा अतिशय आदर्श निष्कलंक व मनमिळावू राजकारणी समाजकारणी या स्वरूपाचे आहे आम्ही सर्वजण आपणाकडे विनंती करत आहोत की आमच्या पत्राची दखल तात्काळ घेऊन शंभर फुटी रस्ता भविष्यात एक आदर्श रस्ता एक पर्यावरण स्नेही टिकाऊ मजबूत रस्ता बनवा यासाठी आपणाकडून योग्य ते सक्त आदेश संबंधितांना व्हावेत सदर रस्त्याच्या बांधकामातील तांत्रिक अनिमित्त आर्थिक अनिमित्त थांबून हा रस्ता एक आदर्श रस्ता म्हणून नावारूपास यावा याबद्दल अपना मार्फत योग्य ते आदेश व्हावेत ही नम्रतेची विनंती आपला मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राजेश शिरटीकर जयराज पाटील, गोविंद शिंदे आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या