मोहफूल पडू लागले, वणव्यांचा धोका वाढला

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 27/03/2024 8:52 AM


 प्रतिनिधी पेंढरी: प्रशांत पेदापल्लीवार मो.न.९४०५३५६०७०

 पेंढरी : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोहफूल पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वणवे लागण्याचा धोका वाढला आहे. मोहफुलाच्या झाडाखाली असलेला पालापाचोडा जाळण्यासाठी आग लावली जाते. पुढे या आगीवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे ही आग पसरत जंगलभर पसरते. शेतातील झाडाला लावलेली आग परिसरात पसरून तणशीचे ढीग व इतर बाबींचे नुकसान करते. त्यामुळे आता वन विभागाने सावध राहण्याची गरज आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. पुन्हा ऊन शेकत असल्याने आगीचा धोका वाढला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या