शिक्षकांचा ड्रेस कोडला विरोध : २८ तारखेला शाळेत शिक्षकांनी जिन्स घालून येणेचे संघटनांचे आवाहन

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 27/03/2024 1:44 PM



शासनाने १५ मार्च २०२४ रोजी शिक्षकांचा पेहराव व ड्रेस कोर बाबत आदेश दिले आहेत. या आदेशाला विरोध करण्यासाठी म्हणून २८ मार्च रोजी सर्व शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व मनपा प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीने केले आहे.
      सध्या जगाच्या अनेक कक्षा वृद्धांवत असताना शिक्षकांना विविध बंधन घालणे हे योग्य नाही. शिक्षक शाळेत जाताना योग्य समाजमान्य पेहराव करूनच शाळेत जातात असे असताना ड्रेस कोड च्या नावा खाली शिक्षकांना पेहरावा बाबत बंधने घालणे हे काळाला धरून नाही. यापूर्वी शासने शिक्षकाचा फोटो वर्गात लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याला ही सर्व शिक्षक संघटनानी तीव्र विरोध केला होता व तो निर्णय हाणून पाडला आहे.
तरी येत्या गुरुवारी २८ तारखेला शहर व जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने भरत रसाळे , सुधाकर सावंत , राजेंद्र कोरे , संतोष आयरे, विलास पिंगळे , दिलीप माने यांनी केले  आहे.,

Share

Other News

ताज्या बातम्या