सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामधील संजयनगर येथील झोपडपट्टी नियमानुकल करण्याबाबत ०५ झोपडपट्टी लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
आमदार गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समिती यांचे मार्फत वेळोवेळी पाठपुरावा करून या महत्वपूर्ण कामात मोठे योगदान मिळाले आहे.
सांगली शहर येथील सर्वे नंबर २२६/०१ ब येथे संजयनगर, सांगली पत्र्याची चाळ ही तत्कालीन महानगरपालिकेने १९८२ ला बसवलेली असून याठिकाणी १४० कुटुंबांना खोल्यांच्या स्वरूपात भाडेतत्वावर असल्याने या झोपडपट्टी धारकांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नव्हता. पण या यशामुळे वसाहतमधिल नागरीकांच्या आज सिटी सर्वे नोंद होवुन त्यांना मालकी हक्काचे उतारे मिळणार आहेत. यामुळे या सर्व कुटुंबांना शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन पक्के घरचे स्वप्न पूर्ण होण्यास हे खूप मोठे पाऊल घेण्यात आलेले आहे.