नांदेड :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 15 डिसेंबर रोजी 2 डी इको तपासणी शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची 2 डी इको तपासणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे आयोजीत करण्यात करण्यात आली होती. या शिबिरात जिल्ह्यातील एकूण 181 बालकांची तपासणी करण्यात आली असून, किम्स हॉस्पिटल, ठाणे येथे एकूण 75 पात्र बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रसूती केंद्रामध्ये जन्माला येणाऱ्या बालकाची, प्रसूतीदरम्यान निर्माण झालेल्या गुतागुंतीमुळे ज्यांना एसएनसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या नवजात बालकांची, आशांमार्फत गृहभेटी दरम्यान आढळून आलेल्या बालकांची व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत बालकांची तपासणी दरम्यान त्याच्यातील जन्मजात व्यंग ओळखण्यासाठी तपासणी व आवश्यकतेनुसार उच्य उपचारासाठी डीईआईसी (District early intervention centre- जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र) येथे संदर्भ सेवा देण्यात येतात. सदरील डीईआईसी अंतर्गत विविध स्तरावरून संदर्भित लाभार्थ्यांच्या 4 D's विशेषतः नवजात बालकांमधील आढळून येणारे व्यंग (Birth Defects) लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार (Deficiencies) व वाढीच्या समस्या (Developmental Delay) इत्यादी प्रकारच्या 4 D's चे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य औषधोपचार करण्यात येतात व गरजेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येते.
या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय परके, निवासी वैद्यकीय अधिकारी, राजाभाऊ बुट्टे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, एनसीडी नोडल अधिकारी हनुमंत पाटील, जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ डॉ.साखरे, डॉ.पुष्पा गायकवाड, मेट्रन सुनीता राठोड यांच्या नेतृत्वात्वाखाली हृदयाचे आजार असलेल्या बालकांची २ डी इको तपासणी करण्यात आली. ही तपासणी किम्स हॉस्पिटल, ठाणे येथील लहान मुलांचे तज्ज्ञ डॉ. श्रीनिवासन एल. व डॉ.सोनिया कारापुरकर सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ञ या विशेषतज्ज्ञांच्या मार्फत पार पडले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनिल कांबळे आरबीएसके जिल्हा समन्वयक, एफएलसी अश्फाक शेख, संपूर्ण आरबीएसके वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डीईआयसी मधील अधिकारी कर्माचारी, जिल्हा रुग्णालयातील इंचार्ज सिस्टर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.