नांदेड: अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता जालना येथे आयोजित करण्यात आली आहे.
शिक्षक सहकारी पतसंस्था सभागृह, रेल्वे ओव्हर ब्रिजखाली, भाग्य नगर, जुना जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी समता परिषदेची राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे तसेच कांही जिल्हास्तरीय पदे तसेच महिला आघाडीचीही निवड करण्यात येणार आहे. सन २०२६ च्या कार्यक्रमांचेही नियोजन तसेच राज्यस्तरीय गुरु रविदास जयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीस समता परिषदेचे आजी माजी पदाधिकारी तसेच बहुभाषिक चर्मकार समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन बैठकीचे आयोजक दिपक इंगळे, गणेश शिंदे यांनी केले आहे.