भाच्यानेच केला मामाचा खुन, शिंदा ता. कर्जत येथील खुनाचे गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचेकडुन उकल प्रतिनिधी राविराज शिंदे..

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 23/01/2026 8:14 AM

दिनांक :- 22/01/2026

-----------------------

------------------------------
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मयत नामे हनुमंत गोरख घालमे वय 35 वर्षे, रा. भाळावस्ती, शिंदा ता. कर्जत, जि. अहिल्यानगर हा दिनांक 06/01/2026 रोजी त्याचे राहते घरी झापलेला असतांना सकाळी 06.00 वा. चे पुर्वी कोणीतरी अज्ञात आरोपीने मयताचे डोक्यामध्ये काहीतरी टणक हत्याराने मारुन जिवे ठार मारले आहे. सदर घटनेबाबत अज्ञात आरोपीविरुध्द कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 09/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 
सदर खुनाचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्यानंतर घटनाठिकाणी मा. श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी केली व गुन्हा उघडकीस आणणेकामी दोन पथके स्थापन करण्यात आली होती. सदर पथकामध्ये पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, भिमराज खर्से, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, अर्जुन बडे, चंद्रकांत कुसळकर, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांचा समावेश करण्यात आला होता. 
गुन्हा उघडकीस आणण्याकरीता स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी घटनाठिकाणी भेट देवुन आरोपीचे गुन्हा करण्याचे पध्दतीवरुन तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे सलग 15 दिवस तपास करुन माहिती काढली. गुन्ह्याचे तपासामध्ये पथक मयताचे आर्थीक व्यवहार, यापुर्वीचे वाद याबाबतची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत मयत हा वेळोवेळी त्याचे भाच्याकडे पैशाची मागणी करत असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने मयताचा भाचा तेजस रामदास अनभुले वय 21 वर्षे, रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल व बारकाईने तपास केला असता त्याने खुन केल्याची कबुली देवुन त्याचा मयत मामा हनुमंत गोरख घालमे याचेवर बरेच कर्ज असल्याने तो वेळोवेळी पैशाची मागणी करत होता. त्यानुसार तेजस रामदास अनभुले व त्याचे आई वडिलांनी मयतास वेळोवेळी पैसे पुरविलेले असुन मयत याने पुन्हा त्यांचेकडे 10 लाख रुपयांची मागणी केली असता आरोपी तेजस अनभुले याचे आई वडिलांनी मयतास पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मयताने आरोपी व त्याचे आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्या कारणावरुन आरोपी याने मयताचे डोक्यामध्ये टणक वस्तुने मारुन त्याचा खुन केला असल्याची माहिती कळविलेली आहे. 
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 09/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहेत.  
 सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या