दिनांक :- 22/01/2026
-------------
मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामधील अवैध दारु विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार गणेश लबडे, सुयोग सुपेकर, शाहिद शेख, सागर ससाणे, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध रित्या दारु विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथक दिनांक 21/01/2026 रोजी एम.आय.डी.सी. परिसरामध्ये अवैध रित्या दारु विक्री करणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रोडलगत असलेले हॉटेल राजयोग या ठिकाणी अवैध रित्या दारु विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी इसम नामे संदीप रावसाहेब आव्हाड वय 42 वर्षे, रा. पांगरमल, ता. जि. अहिल्यानगर हा विनापरवाना विदेशी दारु विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला आहे. सदर इसमाचे ताब्यातुन 11,000/- रुपये किमतीची विविध कंपन्याची विदेशी दारु जप्त करण्यात आलेली आहे.
ताब्यातील इसम नामे संदीप रावसोहब आव्हाड यांचेविरुध्द पोकॉ/902 सागर अशोक ससाणे नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. 57/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदाक लम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.