बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्याची रविवारी नांदेड येथे तातडीची बैठक

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/01/2026 7:58 PM

नांदेड : बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्याची तातडीची बैठक रविवार,  दिनांक २५/०१/२०२६ रोजी दुपारी ठीक ०१.०० वाजता 'बीएसपी भवन', कावळे कॉम्प्लेक्स, वाय पॉईंट, गणेश नगर रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
        तथागत बुद्ध, बसवण्णा, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, पेरियार ई. व्ही. रामस्वामी नायकर, बिरसा मुंडा आदी तमाम बहुजनवादी महापुरुषांच्या तसेच बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, आयरन लेडी बहन मायावतीजी यांच्या विचारावर काम करणारी बहुजन समाज पार्टी असून सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
          सदर बैठकीमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा नूतन कार्यकारीणी, युवा आघाडी, विद्यार्थ्यी आघाडी, महिला आघाडी, शहर कार्यकारिणी, बिव्हीएफ तसेच विविध भाईचारा कमिट्या गठीत करावयाच्या आहेत अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. संतोष शिंदे व मराठवाडा झोन प्रभारी मनीषभाऊ कावळे यांनी दिली आहे.
         तरी जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीच्या सर्व सक्रीय आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी सदर महत्त्वाच्या तातडीच्या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या