स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ राज्य शासन व केंद्र शासन शासनाचे Flagship कार्यक्रम प्रशिक्षण शाळा संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 23/01/2026 7:43 PM

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ राज्य शासन व केंद्र शासन 
शासनाचे  Flagship कार्यक्रम प्रशिक्षण शाळा संपन्न

भगूर नगरपरिषद भगूर येथे जिजामाता संकुल शहर उपजीविका केंद्र येथे सदर कार्यशाळा संपन्न झाली .
सदर कार्यशाळेसाठी मा.मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांच्या सूचनेनुसार  जिल्हा तांत्रिक तज्ञ अद्वैत कराळे यांनी उपस्थित असलेल्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षा ,उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक ,नगरसेविका यांना मार्गदर्शन केले तसेच शहर समन्वयक गोरख भालके यांनी उपस्थित असलेल्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षा ,उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक ,नगरसेविका यांना स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत असलेली स्पर्धा संदर्भातील toolkit नुसार १०५०० गुणांची स्पर्धा हि संपूर्ण देशभरात असून भगूर नगरपरिषद भगूर ने दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी सहभाग नोंदविला आहे.सदर कार्यशाळेत शहराचा सौंदर्यीकरण करणे , शहर कचरा मुक्त करणे ,प्रत्येक नागरिकांनी कचरा वेगळा करून देणे ,आपला प्रतिसाद नोंदविणे ,मैला व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन ,स्वच्छतागृहांची उपलब्धता,स्वच्छ वार्ड स्पर्धा ,ह्या विषयांवर चर्चा करण्यात आली .
सदर कार्यक्रमात मा.नगराध्यक्षा सौ.प्रेरणा विशाल बलकवडे यांनी उपस्थित असललेल्या सर्व नगरसेवक ,नगरसेविका ,कर्मचारी  व बचत गट महिला यांना स्वच्छता विषयी  मार्गदर्शन केले. ह्या स्पर्धेसाठी सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी , नगराध्यक्षा ,उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक ,नगरसेविका यांच्यासह गावचा सहभाग महत्वाचा आहे असे सांगितले .
सदर कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा सौ. प्रेरणा विशाल बलकवडे , उपनगराध्यक्ष श्री.प्रसाद अंबादास आडके , सर्व मा.नगरसेवक ,नगरसेविका  ,मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल, स्वप्नील मोकळ पाणीपुरवठा अभियंता ,दिनेश कचवे स्वच्छता निरीक्षक ,रोहित सुरसे संगणक अभियंता ,चित्रा भवरे सहायक प्रकल्प अधिकारी , सफाई कर्मचारी उपस्थित होते .

Share

Other News

ताज्या बातम्या