ऑक्सीजन, व्हेंटिलेटरची कमतरता नाही; जिल्हाधिकारी

  • रिजवान मकानदार (Latur)
  • Upadted: 24/09/2020 3:06 PM

लातूर: 
          जिल्ह्यात कोरानाच्या पार्श्वभूमिवर लागणारे ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर मुबलक प्रमाणात असून जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने ऑक्सीजन पुरवठा केला जात आहे. यासाठी तहसिलदरांच्या निगराणीखाली नियंत्रणकक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.२३) पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील कोविड-१९ च्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेली ऑक्सीजनच्या टंचाईवर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीतील गैरसोयीमुळे ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतू, आता जिल्ह्यात पूर्वीपेक्षा अधीक क्षमेतेने ऑक्सीजन निर्मिती केली जात आहे.

 केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर बीड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यातही ऑक्सीजन लातूर येथूनच जात असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून या कक्षासाठी स्वतंत्र तहसिलदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच, जिल्ह्यातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयात २०८ व्हेंटिलेटर उपलब्ध असून कुठेही व्हेंटिलेटरची कमतरता नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन जी. श्रीकांत यांनी यावेळी केले.


Share

Other News

ताज्या बातम्या