राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 21/05/2026 10:46 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)
सातारा दि. : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होण्यास मदत होते. शेतकरी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळू शकते व त्यामुळे राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील एकूण ३ शेतकरी राज्यस्तरावर विजेते झाले आहेत. त्यामध्ये बाजरी पिकात अशोक चंद्र नलावडे मु.पो. विरळी ता. माण यांचा राज्यात प्रथम क्रमांक, सविता मुळीक मु. पो. सासकल ता. फलटण राज्यात द्वितीय क्रमांक तर भात उत्पादनात चंद्रकांत लाड मु.पो. करंजे त परळी ता. सातारा यांचा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे.

राज्यस्तरावरील विजेते ठरल्यानंतर, उर्वरित स्पर्धकांमधून जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर विजेते शेतकरी निवडले जाणार आहेत. सर्वसाधारण आणि आदिवासी गटांकरिता स्वतंत्र विजेते घोषित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते जाहीर करण्यात येणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या