नांदेड : ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट यांच्या वतीने 20 मे 2026 रोजी एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी औषध व अन्न प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त (औषधे) अ.तु. राठोड (मो. 8369027068), अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शि.व. श्रीरामे (मो. 8080108818) तसेच लिपिक टंकलेखक श्रीमती अ.रा. पाटील (मो. 8446318983) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बंदच्या कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास अथवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असेही अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.