नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा 2026 उत्साहात संपन्न;52 खेळाडूंचा सहभाग;राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/05/2026 10:19 PM

नांदेड:- नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिडचेस असोसिएशन,नांदेड व सक्षम चेस अकॅडमी,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली “नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा 2026” शिवाजीनगर,नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील एकूण 52 बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदविला होता.विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त तीन खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतल्याने स्पर्धेची रंगत अधिक वाढली.स्पर्धा U-7, U-9, U-11 व U-13 या वयोगटांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र गटात घेण्यात आली.लहानग्या खेळाडूंनी अत्यंत चुरशीच्या आणि दर्जेदार डावपेचांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू सृष्टी जोगदंड,कराटे मार्गदर्शक विक्रांत खेडकर, तायक्वांदो मार्गदर्शक बालाजी जोगदंड,राष्ट्रीय पंच डॉ. दिनकर हंबर्डे तसेच चैतन्य गोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके,पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे 
मुलांचे गट
U-7 मुले
 प्रथम निश्चय ऐतवाडे 
द्वितीय  अभिनंदन हंबर्डे
U-9 मुले प्रथम विराज देशमुख,द्वितीय सुशांत शिवभक्त,
तृतीय तन्मय राठोड,
U-11 मुले प्रथम पार्थ शामे,
द्वितीय शौर्य मुप्पानेनी,तृतीय सार्थक गुंडेवार,U-13 मुले
प्रथम उत्कर्ष पांचाळ,द्वितीय देवांश चव्हाण,तृतीय सोहम कावर,मुलींचे गट U-7 मुली प्रथम काव्या इंगोले,
द्वितीय श्रिशा डोणगावे,U-9 मुली
प्रथम संजीवनी देवडे,
द्वितीय अद्विका कोकाटे,
तृतीय सानवी माळी,
U-11 मुली प्रथम सान्निधी पाटील,द्वितीय प्रांजल हुक्के,
तृतीय अन्वी लोणे,U-13 मुली
प्रथम शिवांगी कुलकर्णी,
द्वितीय सानवी निकम,तृतीय स्वराली पतंगे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व सहकारी,पालक व बुद्धिबळप्रेमींचे आभार मानले.निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आगामी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या