आपले सरकार सेवा केंद्र मुलाखत प्रक्रियेत आक्षेप-हरकत असल्यास सादर करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 18/05/2026 9:24 PM

नांदेड  :- जिल्हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रासाठी एकूण १ हजार २२० उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन १५ व १६ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे करण्यात आले होते. या मुलाखतीचा अंतरिम निकाल शनिवार १६ मे २०२६ रोजी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://nanded.gov.in/ येथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

या मुलाखतीनंतर करण्यात आलेली निवड ही अंतरिम स्वरूपाची असून संबंधित उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी व पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच निवड निश्चित करण्यात येणार आहे. या मुलाखत प्रक्रियेबाबत कोणत्याही उमेदवारास काही आक्षेप/हरकत असल्यास त्यांनी त्याबाबतचा लेखी अर्ज आवश्यक पुराव्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील आवक कक्षामध्ये (तळ मजला) दिनांक १९ मे २०२६ ते २२ मे २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावा.

आक्षेप सादर करताना या बाबींची नोंद घ्यावी
आक्षेप लेखी स्वरूपात (नोंदणी क्रमांकासह) असावा. संबंधित पुरावे / कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक राहील. अर्जावर उमेदवाराचे नाव, ग्रामपंचायत, मोबाईल क्रमांक व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा सेतू समिती नांदेड यांनी केले आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या