वेदांत बंडगर खून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावे,- सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/06/2026 2:47 PM

 सांगली प्रतिनिधी 
        सांगलीतील अभय नगर परिसरातील माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून त्यांच्या 14 वर्षीय नातवावर बेधुंदपणे गोळीबार करत त्याचा निर्गुण पणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गेल्या काही दिवसात सांगलीमध्ये घडली होती. यामध्ये वेदांत बंडगर यांच्या डोळ्यांमध्ये गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याच्या प्रकार समोर आला होता.  वेदांत बंडगरचा निष्पाप बळी गेला होता.
     दरम्यान या खून प्रकरणी. तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालविण्यात यावी आणि या केस मध्ये राज्य सरकारने तात्काळ सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार तसेच सर्व पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  मागणी  करावी. असे मत लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे यांनी व्यक्त केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या