सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा!

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 23/08/2026 10:23 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा दि:
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद, सातारा येथे सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली.

यावेळी आमदार धैर्यशील कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष श्री. राजूभैय्या भोसले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महिला व बालकल्याण सभापती सौ. ऋतुजा विराज शिंदे, शिक्षण व आरोग्य सभापती सौ. तेजस्विनी कदम, कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ. लता अविनाश कर्णे, समाजकल्याण समितीचे सभापती श्री. ऋषिकेश अविनाश धायगुडे-पाटील, युवा नेते श्री. विराज शिंदे, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस श्री. विठ्ठल बलशेटवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीमध्ये जिल्ह्यात सुरू असलेली तसेच प्रस्तावित विकासकामे, त्यांची प्रगती, निधीची उपलब्धता आणि कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच शैक्षणिक सुविधा, शाळांच्या इमारती, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, आरोग्य सेवा, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीच्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.
यावेळी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना विकासकामांना गती देऊन दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना ना. जयकुमार गोरे भाऊ यांनी दिल्या. जिल्ह्यातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन प्राधान्यक्रमाने विकासकामे मार्गी लावण्यावर भर देण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या